सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती व उत्कृष्ट भजनी कलाकार अजिंक्य कृष्णा पाताडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.सुकळवाड ता.मालवण येथील पाताडे हे भजनी बुवा व गायक म्हणून सुपरीचीत आहेत.मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी अडीच वर्षे भूषविले असून अनेक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला होता.एक कलाकार व प्रशासकीय अनुभव यामुळे त्यांची निवड या समितीवर करण्यात आली आहे.सदरची निवड नुकतीच उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी एका आदेशद्वारे जाहीर केली आहे.
जिल्हा कलाकार मानधन समितीवर अजिंक्य पाताडे यांची सदस्य म्हणून निवड











