खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पार्श्भूमीवर नुकतीच शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘राखी बनविणे कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खारेपाटण केंद्र शाळा नं.१ शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी हस्तकला उपक्रमाअंतर्गत स्वतः.विविध आकाराच्या व वेगवेगळ्या रंगाच्या राख्या बनविल्या होत्या. तर या कार्यशाळेसाठी शाळेच्या शिक्षिका रुपाली पारकर मॅडम व अमृता ब्रम्हदंडे मॅडम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.यावेळी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व मुलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, गौरी शिंदे, उपाध्यक्ष मंगेश तेली पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव यांनी शाळेच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बनविलेल्या राख्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत ‘राखी बनविणे ‘कार्यशाळा संपन्न












