मानाचा फेटा बांधून केले स्वागत
कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज ऊन्नती मंडळ शाखा कणकवली चे तालुकाध्यक्ष तथा ओम भालचंद्र फेटे सर्व्हिस चे सर्वेसर्वा महानंदा चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली. जिल्हाधिकारी तावडे याना खास मानाचा फेटा स्वतःच्या हाताने बांधून महानंदा चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तावडे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करताना त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.











