ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रवीण तळेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पुंडलिक तळेकर यांची निवड करण्यात आली ओसरगाव ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी प्रदीप तळेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली या आधी ओसरगावचे उपसरपंच, सोसायटी चेअरमन, देवस्थान खजिनदार अशा विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात गेली ३० वर्षे प्रदीप तळेकर काम करत आहेत गेली १३ वर्षे सतत ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध प्रदीप तळेकर यांची निवड करण्यात येत आहे. यावेळी सरपंच सुप्रिया कदम यांनी प्रदीप तळेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत, पोलीस पाटील संजना आणणे, ग्रामस्थ सुदर्शन नाईक, रवींद्र देसाई, प्रदीप राणे, गणेश राणे, शंकर परब, दत्तात्रय परब, सदाशिव परब, महादेव परब, प्रकाश चौकेकर, राहुल आंगणे, विनोद राणे, निखिल कुलकर्णी, नितीन धुरी, मुरली परब, प्रदीप कदम, पूजा चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!