खारेपाटण येथील नारळ लढविणे स्पर्धा संपन्न

लहान मुले,महिला व युवकांचा मोठा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते संकेत प्रकाश शेट्ये पुस्कृत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खारेपाटण बजापेठ नाक्यात घेण्यात आलेल्या नारळ लढविणे आर्थत नारळ फोडणे स्पर्धेत दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे उद्धघाटन खारेपाटण सरपंच प्राची शेट्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले.संकेत प्रकाश शेट्ये मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या नारळ लढविणे स्पर्धेत खारेपाटण शहरातील शालेय लहान मुले तसेच महिलांनी तसेच युवक वर्गाने मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता. सुमारे १००० पेक्षा अधिक नारळ या स्पर्धेच्या निमताने फोडण्यात आले.तर ही नारळ लढविणे स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!