कणकवली( प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी समाधान धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामसेवक बोडेकर, विजय उर्फ बाळा राणे, सदस्य सुधाकर राणे, विनया राणे, शुभांगी मेस्त्री, रुपाली धुरी, दिलीप तांबे, पोलीस पाटील तुषार तांबे, पिंट्या देसाई, लवेश तांबे, विकास राणे, देवदास धुरी आदी उपस्थित होते.












