पोलिस बांधवाना रक्षा बंधन…!

यशराज प्रेरणा आचरा संघटनेचा अभिनव उपक्रम

आचरा (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार, दुष्कृत्य करणार्याना शासन करण्यासाठी कार्यरत पोलीस बांधवांबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशराज प्रेरणा आचराच्या वतीने आचरा पोलीसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, महेश देसाई, मिनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ, सुदेश तांबे, अभिजीत भाबल, अक्षय धेंडे, परब, यांसह इतर पोलीस कर्मचारी, यशराज प्रेरणा चे मंदार सरजोशी, सुगंधा गुरव, धनश्री आचरेकर, अपराज, संगीता चिंबे, सुगंधी कांदळगावकर, गायत्री वाडेकर, प्रियांका हिंदळेकर आदी उपस्थित होते. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी यशराज प्रेरणा च्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियाका हळदणकर हिने केले. तर आभार सुगंधा गुरव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!