दादरच्या श्रीम.कमला मेहता अंध विद्यालयात रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न

अंधभगिनींच्या आदरातिथ्याने स्वयंसेवकांचे भरून आले अंतःकरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल, जीवन धारा ,जीवन आनंद संस्था केअर, वसंत मालिनी आणि सगे सोबती तसेच के.एम.डॉ शिरोडकर हायस्कूल या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्रीमती कमला मेहता दादर स्कुल फॉर द ब्लाइंड – दादर,मुंबई या शाळेत सन १९७७ पासून होत असलेला रक्षाबंधनचा कार्यक्रम यंदाही चैतन्यमय वातावरणात उत्स्फुर्तपणे संपन्न झाला.

यावेळी नेहमीप्रमाणे कार्यक्रमासाठी समस्त नेत्रहीन भगिनी , शिक्षक वर्ग व शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विश्वस्त यांचे शुभंकर आशीर्वाद आणि संयोजकांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. यामुळे कार्यक्रम चांगल्याप्रकारे व उत्स्फुर्तपणे संपन्न झाला. अंधभगिनीच्या आदरतिथ्याने उपस्थित स्वयंसेवकांचे अंतकरन भरून आले. या कार्यक्रमात सगेसोबती च्या समुहाने सुंदर आणि सुस्वर असा गायनाचा कार्यक्रम सादर केला. गायन कार्यक्रमातील काही गाण्यांवर नेत्रहीन भगिनींचे पाय ही थिरकले.अतिशय सुंदर असा कार्यक्रम गेली ४२ वर्षे चालू आहे. कोरोना काळानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरू करण्यात आल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व स्वयंसेवक मंडळी यांचे संयोजकांकडून आभार मानण्यात आले.

दादर येथील अंधशाळेत दर रविवारी नेत्रहीन भगिनींसाठी सकाळी ९:३० ते १२:३० पर्यंत अभ्यासवर्ग चालतो. ज्या महिला स्वयंसेवकांना शक्य असेल त्यांनी श्रीम.वैशाली कांबळे – ८९७६३२७३७५ व श्रीम.गौरी पाताडे – ८२९१०७७१५९ यांच्याशी संपर्क साधावा. व आपला बहुमूल्य वेळ द्यावा.असे आवाहन एस सि आय संस्थेने केले आहे.

error: Content is protected !!