केंद्राच्या आयुष्यमान भाव मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चार महिने चालणार आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरण करण्यासाठी आयुष्मान आपल्यादारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी आदी मोहीम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार लाभार्थ्यांना ही कार्ड वाटप झाली असून शिल्लक ३३ हजार २३९ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!