पियाळीत ऊस बागायतीला आग ; लाखो रुपये नुकसान

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज भर दुपारी ऊस बागायती शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलम चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्याने व वारा सुटल्याने आगीचा माळराना पर्यंत भडका उडाला आहे.

दरवर्षी येथे आग लागून ऊस बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या वर्षी ही आग लागून नुकसान झाले होते.वेळोवेळी पंचनामे केले परंतु अद्याप ही कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावीशी वाटत नसल्याचे ऊस बागायती शेतकरी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांनी बोलताना सांगितले आहे.

error: Content is protected !!