भाजपा तर्फे ५ सप्टेंबरला गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी): भारतामध्ये अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळाच्या ओघात सुद्धा गुरुचे महत्व अबाधित राहिलेले आहे. समाज घडविण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असतो हे कोणीही नाकारू शकत नाही.भाजपाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.यावर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे ज्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यामध्ये आपले जीवन खर्च केले व समाज बांधणीसाठी योगदान दिले त्या निवृत्त मुख्याध्यापकांचा विशेष सन्मान सोहळा सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला मध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सदस्य शरदजी चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तरी गुरु शिष्य परंपरेला आयाम देण्याच्या उद्देशाने भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!