चलचित्र देखावे व उंच दहीहंड्या आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असणार खास आकर्षण
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाचा दहीकाला उस्तव हा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असून येथील सार्वजनिक दहीकाला उस्तवात यंदा पौराणिक चलचीत्र देखावे तसेच खारेपाटण एस टी बस स्थानक येथील भव्य मानाची दहीहंडी व विविध राजकीय पक्षांच्या बांधण्यात येणाऱ्या विविध दहीहंड्या आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे या दहीकाला उस्तवाचे खास आकर्षण असणार आहे.अशी माहिती खारेपाटण सार्वजनिक दहीकाला उस्तव कमिटीचे कार्यवाह प्रवीण लोकरे यांनी दिली.
खारेपाटण दहीकाला उस्तवात यंदा कुडाळ येथील भैरव जोगेश्वरी मित्र मंडळाचा हनुमान संजीवनी पर्वत हा आकर्षक देखावा दाखवण्यात येणार आहे.तर विविध राजकीय पक्षांच्या दहीहंड्या देखील बांधण्यात येणार असून या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याचे दहीकाला उस्तव कमिटीचे सदस्य मंगेश गुरव यांनी सांगितले.
खारेपाटण येथील दहीकाला उस्तव पाहण्यासाठी दशक्रोषितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.यंदा प्रथमच खारेपाटण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व शिवसेना पक्ष शिंदे गटाची देखील दहीहंडी गोविंदा पथकासाठी बांधण्यात येणार आहे. खारेपाटण येथे दहीकाला दिवशी खारेपाटण गावात स्थानिक मंडळाच्या दहीहांड्या फोडल्या जातात. त्यानंतर खारेपाटण बंदरवाडी येथील सार्वजनिक दहीकाला दिंडी देखाव्यासह खारेपाटण बाजारपेठेत वाजत गाजत येतो.दुपारनंतर खारेपाटण गावातील मुख्य दहीकाला उस्तवाला सुरवात होते. हा दहीकाला उस्तव व उंच दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला खारेपाटण मध्ये दशक्रोषीतील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात तसेच यावेळी खारेपाटण येथील दहीहंडी फोडण्यासाठी राजापूर मधील प्रसिद्ध महिला गोविंद पथक देखील येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.












