मृत्यूच्या दारातून २५ वर्षांचा प्रवीण घाडीगावकर सुखरूप घरी

खा.नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांच्या आशीर्वादाने तरुणाला नवजीवन!

नामदेव चव्हाणांच्या प्रयत्नाला यश :’कोकिलाबेन’मध्ये २५ लाखांचे उपचार मोफत

कणकवली ( प्रतिनिधी) : “साहेब, आमचा मुलगा वाचवा हो… काहीही करा, पण त्याला परत आणून द्या!” एका आई-वडिलांची ही कारुण्यभरी आर्त हाक आणि त्यांच्या डोळ्यांतील थरथरणारी भीती… विक्रोळीतील त्या भीषण अपघातानंतर घाडीगावकर कुटुंबावर जणू आभाळच कोसळले होते. अवघ्या २५ वर्षांचा प्रवीण! मेंदूला गंभीर दुखापत, चेहऱ्याचा झालेला चक्काचूर आणि मोडलेला पाय… एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरताना डॉक्टरांनी जेव्हा “हा वाचण्याची शक्यता फार कमी आहे” म्हणून हात टेकले, तेव्हा त्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपला डोळ्यांसमोर तडफडणारा तरुण मुलगा आता आपल्याला सोडून जातो की काय, या भीतीने संपूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर होते.पण म्हणतात ना, जिथे वैद्यकीय उपचार संपतात, तिथे माणसाची श्रध्दा आणि देवमाणसाची साथ सुरू होते!
गावाकडे ही माहीती समजताच करंजे सरपंच सौ. सपना मेस्री व विभागातील जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी त्वरित खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते,आरोग्याच्या संबंधीत तातडीने मदतीसाठी धावून जाणारे भाजप मुंबई सचिव (कामगार आघाडी) नामदेव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. तातडीने मदतीची विनंती केली. साक्षात देवदूत बनून ते धावून आले. मध्यरात्रीचा १ वाजला होता. मुंबई गाढ झोपेत असताना, एका अनोळखी तरुणाच्या आयुष्याची वात विझू नये म्हणून नामदेव चव्हाण स्वतः ‘कोकिलाबेन हॉस्पिटल’च्या दारात उभे ठाकले.
त्यांनी प्रवीणला तत्काळ अतिदक्षता विभागात (ICU) दाखल केले. पुढील दोन महिने… मृत्युशी चाललेली ती झुंज अगदी जवळून पाहिली. डॉक्टरांचे पथक रात्रंदिवस राबत होते आणि बाहेर नामदेव चव्हाण त्या कुटुंबाचा खंबीर आधार बनून उभे होते. चेहऱ्याची कठीण प्लास्टिक सर्जरी झाली, मेंदूवर अतिसूक्ष्म उपचार झाले आणि अखेर… नियतीलाही माघार घ्यावी लागली! प्रवीणने डोळे उघडले, तो हसला आणि एका कुटुंबाचे उध्वस्त होणारे जग पुन्हा फुलले.
दोन महिन्यांच्या या अथक उपचारांचा खर्च तब्बल २५ लाख रुपये झाला होता. एका सामान्य कुटुंबासाठी ही रक्कम म्हणजे जन्माची पुंजी पणाला लावण्यासारखी होती. मात्र, नामदेव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा संपूर्ण २५ लाखांचा खर्च मोफत झाला!
जेव्हा प्रवीण सुखरूपपणे आपल्या गावी, करंजे (गावठणवाडी) येथे पोहोचला, तेव्हा संपूर्ण गाव भावूक झाले होते. आपल्या पोटच्या गोळ्याला नवजीवन मिळालेले पाहून घाडीगावकर कुटुंबीयांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते! घाडीगावकर परिवार, सरपंच सौ. सपना मेस्त्री व माजी सरपंच मंगेश तळगावकर आणी ग्रामस्थांनी राणे साहेब आणि नामदेव चव्हाण यांचे अत्यंत भावूक होऊन आभार मानले.नामदेव चव्हाण यांचा सत्कार करताना गलबलून येत म्हटले, “आज आमचा मुलगा आमच्यासमोर उभा आहे, हे फक्त तुमच्यातील देवमाणसामुळे! त्यांनी केवळ २५ लाखांचे उपचार मोफत मिळवून दिले नाहीत, तर आमच्या घराचा दिवा विझण्यापासून वाचवला.”

error: Content is protected !!