कोकणच्या किनाऱ्यावर औद्योगिक क्रांतीची नांदी!

₹27 हजार कोटींच्या शिपयार्ड प्रकल्पातून 90 हजार रोजगारांची निर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या पर्यायाने कोकण विकासाच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जात आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तब्बल ₹27 हजार कोटींची गुंतवणूक आणि सुमारे 90 हजार रोजगारनिर्मिती असलेला हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सागरी औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या ‘मेरीटाइम अमृत काल व्हिजन 2047 ‘च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.

या ऐतिहासिक प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कराराच्या माध्यमातून दिघीला देशाच्या आधुनिक जहाजबांधणी उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे. जहाजबांधणी प्रकल्पाच्या या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा 40 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना मिळाले यश

या संपूर्ण प्रकल्पामागे राज्याच्या बंदरे विकासाला नवी दिशा देण्याची दूरदृष्टी दिसून येते. मत्स्य व बंदरे मंत्री नितेशराणे यांनी खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून सागरी क्षेत्रातील गुंतवणूक, बंदरविकास, जहाजबांधणी आणि रोजगारनिर्मिती यांना एकत्रितपणे गती देण्याचा प्रयत्न केला आहे. दिघीचा ₹27 हजार कोटींचा प्रकल्प ही त्या दिशेने मिळालेली मोठी उपलब्धी म्हणून पाहता येते.

दिघीतील शिपयार्ड प्रकल्पासाठी नितेश राणे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे व्हिजन आणि मंत्री नितेश राणे यांचा सागरी क्षेत्रातील सक्रिय पाठपुरावा यांच्या माध्यमातून दिघीचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला जागतिक पातळीवर नेण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

error: Content is protected !!