असलदे येथील प्रतीक वाळके कुटुंबीयांचे मा.आ. वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी केले सांत्वन

वडाचे झाड अंगावर पडून प्रतीक वाळके याचा झाला मृत्य

नांदगाव (प्रतिनिधी) : देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने रस्त्यालगतची अनेक झाडे तोडली आहेत. मात्र असलदे येथील वडाचे जुने आणि धोकादायक स्थितीत असलेले झाड ठेकेदाराने तोडले नसल्याने १५ सप्टेंबर रोजी या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्या प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) याच्या दुचाकीवर ते वडाचे झाड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे एका युवकाचा हाकनाक बळी गेल्याने वाळके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून काल रविवारी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी असलदे येथे प्रकाश वाळके व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी तात्या निकम,सचिन लोके,अनिल नरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!