भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या घरी घेतले गणेशदर्शन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी भेट देत भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडी उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाचे आशीर्वाद घेत मनमोकळ्या गप्पांनी ही सदिच्छा भेट संस्मरणीय ठरली.












