गरजूंनी रोटरी क्लब वैभववाडीशी संपर्क साधावा असे केले आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कमतरता लक्षत घेऊन चार्टर्ड प्रेसिडेंट रो संतोष टक्के यांनी रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांच्याशी संपर्क साधून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची मागणी केल्यानंतर रेडक्रॉस सोसायटी यांचेकडून वैभववाडी रोटरी क्लबसाठी देणेत आले. माजी असि गव्हर्नर घाटवळ, रो.डॉ प्रशांत कोलते यांचे सहकार्य या कामी लाभले.
या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चा उपयोग वैभववाडी तालुक्यातील गरजूं रुग्णासाठी होणार असल्याचे प्रेसिडेंट रो संजय रावराणे यांनी स्पष्ट करून रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांचे आभार मानले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी संपर्क- रोटरी क्लब ऑफ वैभववाडी 9423300274, 8766884754












