तत्कालीन सरपंच दादा साईल यांचा यशस्वी पाठपुरावा
कुडाळ (अमोल गोसावी) : एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्ष्यात राज्यस्तरीय महाआवास योजना मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पणदूर ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पालकमंत्री मान.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान..
भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष आणि तत्कालीन सरपंच दादा साईल यांच्या कारकिर्दीत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत यशस्वी पाठपुरावा केला होता
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती, आदर्श ग्रामसेवक आणि आदर्श शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी 2022-23 या आर्थिक वर्ष्यात राज्यस्तरीय महाआवास योजने अंतर्गत रमाई आवास योजनेत जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुले बांधून पूर्ण केल्याबद्दल कुडाळ तालुक्यातील पणदूर ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पालकमंत्री मान.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच पल्लवी पणदूरकर, उपसरपंच साबाजी मस्के आणि ग्रामसेवक सपना मस्के यांनी स्वीकारला.
भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष आणि तत्कालीन सरपंच दादा साईल, उपसरपंच बबन पणदूरकर, ग्रा.प.सदस्य आबा सावंत, मयुरी पणदूरकर, सुविधा सावंत, अनघा गोडकर, अंकिता राऊळ, किरण मोरे यांच्या कारकिर्दीत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पणदूर सिद्धार्थ नगर मधील मागासवर्गीय लाभार्थ्यांना राज्यस्तरीय रमाई आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घरकुले मंजूर करून ती बांधून पूर्ण केल्या बद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक देऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे,भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल आदी उपस्थित होते.










