कणकवली (प्रतिनिधी) : नुकताच कुंभवडे येथे ग्रामपंचायत कुंभवडे व संकल्प प्रतिष्ठान आयोजित महिलां बचतगट सदस्यांसाठी फिनेल तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मानवी गरजा अन्न, वस्त्र, निवारा व त्याच बरोबरच शिक्षण व आरोग्य होय. आरोग्य सांभाळण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची व या स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून फिनेलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्राहकांची ही गरज म्हणजेच उद्योग संधी. या संधीचा लाभ घेता यावा दृष्टिकोनातून कुंभवडे येथे 15वा वित्त आयोग निधीतून कुंभवडे (कणकवली) येथे ग्रामपंचायत पुरस्कृत फिनेल तयार करण्याचे प्रशिक्षण संकल्प प्रतिष्ठान द्वारा काल देण्यात आले.
यावेळी सुमारे 50 महिलांनी लाभ घेऊन हा व्यवसाय करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सरपंच सौ. विजया कानडे, ग्रामसेवक श्री. प्रशांत वर्दम, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, प्रशिक्षक श्री बांबुळकर, कार्यक्रम समन्वयक श्री अमोल परब इ. उपस्थित होते.अशाच प्रकारच्या प्रशिक्षणासाठी व्हाट्सअप वर संपर्क साधावा. 9145428338.














