खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेत साळीस्ते गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सुरेश साळिस्तेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, सिंधुदुर्ग जिल्हाचे भारिप उपाध्यक्ष तसेच साळिस्ते बौद्ध विकास मंडळाचेअध्यक्ष म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. त्यांचे सर्वच समाजात सलोख्याचे, सौजन्याचे संबंध असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.













