आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विद्याधर पाटील यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मान !

चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ शिक्षकांना शरद कृषी भवन येथे शिक्षक पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले.

कणकवली तालुक्यातील शाळा घोणसरी नं.५ येथे कार्यरत असलेले उपशिक्षक, अखिल प्राथमिक शिक्षक संघ मालवणचे माजी अध्यक्ष, विद्याधर पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन २०२२/२३ चा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” देवून विद्याधर पाटील यांना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विद्याधर पाटील यांनी मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले . तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणचे अध्यक्षपदही भूषविले. यानिमित्ताने अखिल प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा उपाध्यक्ष सुभाषचंद्र नाटेकर, राजेश भिरवंडेकर, परशुराम गुरव, मालवण तालुका सचिव गणेश सुरवसे, नामदेव एकशिंगे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!