कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आयनल गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच बापू ज्ञानदेव फाटक यांची बहुमताने निवड करण्यात आली. सरपंच सिद्धी दहीबावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी बापू फाटक आणि प्रवीण जगन्नाथ साटम हे दोघेही इच्छुक असल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यावेळी बहुमताने बापू फाटक यांच्या नावाला पसंती मिळाल्यामुळे बापू फाटक यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आजच्या ग्रामसभेला पं स माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, ग्रा पं सदस्य सागर घाडी, मारुती तोरसकर, संगीता कुबडे, पेडणेकर, फाटक, अनिल ओटवकर, कांता पेडणेकर, भालचंद्र साटम, साईनाथ ओटवकर, उत्तम ओटवकर, संतोष वायंगणकर, अशोक मगम आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
आयनल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बापू फाटक यांची बहुमताने निवड












