११ किमी मॅरेथॉन पूर्ण करून “फिट है तो हिट है” चा दिला संदेश
तळेरे (प्रतिनिधी) : येथील प्रथितयश डाॅक्टर आणि ”कोकणचो डाॅक्टर फेम” डाॅ.मिलिंद कुलकर्णी यांचा ५४ वा वाढदिवस रांगणा रनर्स आणि टि.व्ही.के.डाॅक्टर ग्रुपच्या वतीने ११ किमी मॅरेथॉन आयोजित करून साजरा केला.
“फिट है तो हिट है” ही थीमलाईन घेवून कुडाळ,कणकवली,तळेरे,वैभववाडी,खारेपाटण येथील ६० डाॅक्टर्सनी आपल्या लाडक्या सहकाऱ्याचा वाढदिवस ही मॅरेथॉन पूर्ण करून साजरा केला.लोकांमधे शारीरिक तंदुरुस्तीची जागृती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.ही मॅरेथॉन तळेरे-विजयदूर्ग राज्य महामार्गावरती सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये डाॅ.मिलिंद कुलकर्णी, डाॅ.सौ.ॠचा कुलकर्णी, डि.एफ.सी.अध्यक्ष डाॅ.राजेंद्र पाताडे, डाॅ.जयसिंग रावराणे, डाॅ.प्रशांत मडव, डाॅ. प्रफुल्ल आंबेरकर, डाॅ.प्रशांत सामंत, डाॅ.मिलिंद बोर्डवेकर, डाॅ.रवींद्र बुरूड, डाॅ.गुरूप्रसाद सवदत्ती, डाॅ.संतोष राणे, डाॅ. चंद्रकांत पुरळकर, डाॅ.संचित खटावकर हे रांगणा रनर्स कडून तर डाॅ.अनघा बोर्डवेकर,डाॅ.उज्वला येळकोटे,डाॅ.शिल्पा मालंडकर,डाॅ.निलिमा पिसे डाॅ.क्षिप्रा गुजर,सौ.सीमा पोकळे,डाॅ.अमृता पाटील, डाॅ.भावना पाताडे,डाॅ. सौ.कणसे, डॉ.सौ.तदुळे या रागिणी ग्रुप तर्फे सामील झाल्या होत्या.
संपूर्ण मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी टि.व्ही.के.ग्रुपचे डाॅ.विजय पोकळे,डाॅ.पाळेकर, डाॅ.संजय कोळी, डाॅ.सुहास पिसे, डाॅ.उमेश बालन, डाॅ.प्रसाद मालंडकर, डाॅ.किरण गुजर, डाॅ.अमित गोखले, डाॅ.बलराज येळकोटे, डाॅ.संतोष वडाम, डाॅ. रोहन तदुळे यांनी विशेष प्रयत्न केले.सूत्रसंचालन डाॅ.संजय कोकाटे व डाॅ.अभिजीत कणसे यांनी केले.यावेळी १० वर्षांच्या मुलांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे नियोजन पार पाडण्यात डाॅ.क्षिप्रा गुजर,डाॅ. सौ.तदुळे आणि सौ.सीमा पोकळे यांनी विशेष परिश्रम घेतले.












