भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नुतन सरपंचाना दिल्या शुभेच्छा
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. स्वरा शिशीर पालकर(नम्रता महंकाळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि चिंदर ग्रामपंचायत सरपंच राजश्री कोदे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेले तीन महिने चिंदर सरपंच पद रिक्त झाले होते. आज निवडणूक निर्णय अधिकारी संजय गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली पारपडलेल्या निवडणूकीत चिंदर गावठणवाडी वाँर्ड क्र.4 च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वरा शिशिर पालकर(नम्रता महंकाळ) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संजय गोसावी यांनी सौ. स्वरा पालकर(नम्रता महंकाळ) यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. निवड झाल्या नंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नुतन सरपंच सौ. स्वरा पालकर(नम्रता महंकाळ) यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले की गावाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करा.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, पक्ष निरीक्षक म्हणून महेश मांजरेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, जान्हवी घाडी, दुर्वा पडवळ, शशिकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, रिया घागरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, प्रिया पालकर, चेअमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, पोलिस पाटील दिनेश पाताडे, माजी सभापती हिमाली अमरे, दत्ता वराडकर, मनोज हडकर, शेखर पालकर, शिशीर पालकर, बाळा पालकर, शंकर पालकर, अजित साटम, अरविंद घाडी, रवि घागरे, राजु पालकर, प्रिया पालकर, समिर अपराज, आबा पालकर, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, सिध्देश नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.












