जि.प.शाळा वारगाव येथे तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वारगाव जि.प.शाळा नं.३ या शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.विलास डहाणू,वारगाव सरपंच सौ नम्रता शेट्ये,उपसरपंच श्री नाना शेट्ये,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मांडवकर,माजी उपसरपंच इरफान मुल्ला,तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेश जाधव, केंद्रप्रमुख श्री गोपाळ जाधव, मुख्याध्यापक सत्यवान केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा होणे काळाची गरज असून महिलांनी पुढे येऊन यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी माजी जि.प.वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र जठार यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी केसरकर यांनी शाळेच्या वतीने सर्व उपस्थिताचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी तृणधान्य पाककला स्पर्धेतील महिलांनी बनविलेले विविध पदार्थाची उपस्थित मान्यवरांनी पाहणी करून कौतुक केले. तर या स्पर्धेचे परीक्षण खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ प्रिया वडाम व सौ कुलकर्णी बाई यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम अर्चना तळगावकर यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्रीम वांशिका महाडेश्वर श्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!