खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील प्रसिद्ध डॉ.विलास डहाणू यांच्या सामाजिक दातृत्वातून कणकवली तालुक्यातील वारगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.३ या शाळेला एक लॅपटॉप व अत्यावश्यक शैशणिक साहित्याचे वाटप नुकतेच माजी जि.प. वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला मबई येथील प्रसिद्ध डॉक्टर व दानशूर व्यक्तिमत्व डॉ.विलास डहाणू,वारगाव सरपंच सौ नम्रता शेट्ये,उपसरपंच नाना शेट्ये,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर मांडवकर,माजी उपसरपंच इरफान मुल्ला,तंतमुक्ती समिती अध्यक्ष राजेश जाधव,केंद्र प्रमुख गोपाळ जाधव,मुख्याध्यापक सत्यवान केसरकर,खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.डहाणू यांनी वारगाव जि.प.शाळा क्र.३ ला शाळेची शैशणिक गरज ओळखून मुलांच्या शैशणिक प्रगतीसाठी लॅपटॉप देण्याचे मान्य केले होते.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच या शाळेला त्यांच्या शुभहस्ते लॅपटॉप व अत्यावश्यक शैशणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शाळेच्या वतीने देणगीदार डॉ.विलास डहाणू यांचे विशेष आभार मानून सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी केले.तर शाळेचे शिक्षक श्रीम वांशिका महाडेश्वर व रवींद्र लोकरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













