युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी घेतले खा.विनायक राऊतांच्या घरी गणेशदर्शन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : युवा शिवसेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आ आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव राऊतवाडी येथील घरी जात त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खा राऊत यांच्या कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी खा राऊत, आ वैभव नाईक, गितेश राऊत, रुची राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर यांच्यासह विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, हरी खोबरेकर, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!