शासनाकडून भात खरेदीला १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२२-२३ अंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी शिल्लक राहिल्यामुळे शासनाकडून भात खरेदीला 15 फेब्रुवारी पर्यंत मदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे भात विक्रीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर संपर्क साधून भात खरेदीच्या नियमानुसार तसेच केंद्र धारकाच्या सूचनेनुसार भात विक्रीसाठी आणावे असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे व व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर यांनी केले आहे.

भात खरेदीची मुदत शासनाकडून ३१ जानेवारी २०२३ अशी देण्यात आली होती. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सावंतवाडी तालुक्यात ३१ जानेवारी २०२३ अखेर सावंतवाडी केंद्र – ३६०० क्वि मळगांव केंद्र – २४६० क्वि. मळेवाड केंद्र – १९३० क्वि, तळवडे केंद्र ७९५ क्वि., कोलगांव केंद्र. – ३०९८ क्वि., मडूरा केंद्र – ७३७ क्वि., डेगवे केंद्र – १०६७ क्वि., इन्सूली केंद्र – ९३८ क्वि. व दोडामार्ग तालुक्यात भेडशी या केंद्रावर १८६० क्विंटल अशी मिळून एकुण भात खरेदी १६५०० क्विंटल एवढी झालेली आहे.

मात्र तालुक्यात भात विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी अद्यापही शिल्लक राहिल्यामुळे शासनाकडून भात खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे. सदरची मुदतवाढ १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असल्याने भात विक्रीपासून वंचित असलेल्या शेतक-यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर संपर्क साधून भात खरेदीच्या नियमानुसार तसेच केंद्रधारकाच्या सुचनेनुसार भात विक्रीसाठी आणावयाचे आहे. असे आवाहन खरेदी-विक्री संघाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!