सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकणात पर्यायने महाराष्ट्रात उद्योजक उभारणीचे काम डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प अविरतपणे करत आहे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावण्याच्या आजच्या युगात शिक्षित तरुणांनी आपला उद्योग सुरू करणे व त्या आधारे अनेकांच्या चरितार्थाचा आदर होणे ही कौतुकास्पद बाब असून अशा नवदुर्गांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टर हेडगेवार समिती सेवा प्रकल्प माणगाव येथे दुपारी चार वाजता आयोजित केला आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयं संघ संघचालक कोकण प्रांत सतीश मोड, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालय उपसंचालक भारत सरकारचे अभय दप्तरदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्याला परिसरातील जास्तीत जास्त तरुण तरुणांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन डॉ. बाबासाहेब नेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने करण्यात आली आहे.