आ.सुनिल प्रभु यांची काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सदिच्छा भेट

सभागृह नूतनीकरण आणि सुसज्ज संगणक लॅब उभारणीबाबत केली संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा

चौके (प्रतिनिधी) : काळसे गावचे सुपुत्र व काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष,आमदार सुनिल प्रभु यांनी श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व.जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे ला शनिवार ४ फेब्रुवारी रोजी सहकुटुंब सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ बांधून दिलेल्या स्वर्गीय जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली व महाविद्यालयालगत असलेल्या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सुयोग्य अशी डिझाईन व प्रस्ताव करण्याच्या सूचनां काळसे गावचे सुपुत्र, वास्तुविशारद भूषण गोसावी यांना दिल्या. तसेच संस्था पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, काळसे हायस्कूलसाठी सुसज्ज व अद्ययावत अशी संगणक लॅब तयार करण्याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

सभागृहाचे नूतनीकरण आणि सुसज्ज संगणक लॅबचे उभारणीसाठी आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मा. आमदार सुनिल प्रभु साहेब यांनी यावेळी दिले.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचा गेली ५ वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचे आणि संस्था संचालक मंडळाचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार सुनिल प्रभु साहेब यांच्या पत्नी सायली प्रभु,मुलगा अंकित प्रभु,यांच्यासह डॉ. दुबे,काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सीए हेमंत परब,सेक्रेटरी केशव सावंत, खजिनदार सिताराम ( दाजी ) परब, संचालक विनोद गोसावी, शरद गोसावी, राजन प्रभु जयवंत केळुसकर, माजी अध्यक्षा अर्चना प्रभु, सुरेश मयेकर तसेच मुख्याध्यापक पेडणेकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते.

error: Content is protected !!