राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवलीत घरोघरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील विद्यानगर बाजारपेठ जळकेवाडी, शिवाजी महाराज नगर, कांबळी गल्ली आदी परिसरातील शहरवासीयांच्या घरी जात घरगुती गणेशदर्शन घेतले.शहरात सर्वांशी सलोख्याचे आणि आपुलकीचे संबंध अबिद नाईक आणि नाईक कुटुंबीय राखून आहेत. गणेश चतुर्थी काळात आवर्जून दरवर्षी अबिद नाईक हे सर्वांच्याच घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतात.

error: Content is protected !!