श्री महाकालेश्वर, काशीविश्वेश्वर मंदिरच्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिरचा होणार पर्यटन विकास

७५ कोटीचा मिळणार निधी; आमदार नितेश राणेंची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकास साठी प्राप्त होणार आहे.महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर, राम मंदिर ला ज्याप्रमाणे पर्यटकांची मांदियाळी असते त्याचधर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिर चा पर्यटन विकास होणार आहे.अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना दिली.

सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पाऊल उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगड मध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटन च्या माध्यमातून आणणार आहे असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!