खारेपाटण येथील प.पू. भालचंद्र महाराज पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर रोजी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दी.२९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे यांनी दिली.

खारेपाटण हायस्कूलच्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न होणाऱ्या संस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सभासदाच्या गुणवंत विद्यार्थी पाल्याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.तरी या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन पत संस्थेचे चेअरमन नासीरभाई काझी यांनी केले आहे.

error: Content is protected !!