अर्धा किलो सोन्याची चोरी !

वेंगुर्ले तालुक्यातील घटनेने खळबळ

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे 19 लाख 72 हजार रुपयांची धाडसी चोरी बुधवारी उघडकीस आली आहे. यामध्ये डायमंडचे डिझाईन असलेले 575 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहेत. याबाबत सलोनी सुधीर लोलयेकर (वय-72 वर्षे, मूळ रा. दाभोली मोबारवाडी ता. वेंगुर्ला) (सध्या रा. अंधेरी (प.) मुंबई) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात बुधवारी फिर्याद दिली आहे.

ही चोरीची घटना दि. 18 जून दुपारी 12.30 वा. ते 21 सप्टेंबर 6 वा. या मुदतीत घडली आहे. याबाबत बुधवारी दाखल फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!