दरड काेसळून भुईबावडा घाट ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून २ किमी अंतरावर दरड कोसळली. सायंकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दरड हटविण्याचे काम करत आहेत.

error: Content is protected !!