देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका औदयोगिक बहुउददेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे सचिव आनंद चौधरी यांची पालघर येथे बदली झाल्याने त्यांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.
यावेळी औदयोगिक बहुउददेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन उल्हास मणचेकर बोलताना म्हणाले की, देवगड तालुका सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन देवगड तालुका औदयोगिक बहुउददेशीय ग्रामीण सहकारी संस्थेला उर्जा व स्थितीत आणूस संस्थेचे काम उंचावणारे काम संस्थेचे सचिव आनंद चौधरी यांनी केले आहे. यामुळे या संस्थेच्या माध्यमातून लघु व्यावसायिकांना छोटी मोठी कर्जे देवून त्याची परतफेडही बहुतांश प्रमाणात वेळीच केल्याचे काम सचिव आनंद चौधरी यांनी केले आहे. यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या जागी देवगड बहुउददेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचा कारभार नुतन सचिव आर बी केंगार यांनी स्वाीकारला आहे.
यावेळी आनंद चौधरी बोलताना म्हणाले की. नव्याने सुरु झालेली पंतप्रधान विश्र्वकर्मा योजना समजून सांगितली व आपल्या तालुक्यातुन अधिका अधिक लाभार्थींना याचा लाभा मिळवून देण्यासाठी स्थानिक सदस्यानी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निमित्ती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचाही लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष उल्हास मनचेकर,उपाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,सदस्य सुनिल सकपाळ,संभाजी साटम,मंगेश जाधव,अरविंद अनभवणे,मारुती नेसवणकर,प्रगती सोहनी,लक्ष्मी जाधव आदी उपस्थित होते.












