वाघनखाच्या मुद्द्यावरून आ. नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार
कणकवली (प्रतिनिधी) : वाघनखे खरेच छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत काय ? असा सवाल शिवसेना उबाठा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी राणे स्टाईलने आदित्य यांचा समाचार घेतला आहे. अफझल खानाच्या वंशावळीत जन्मलेलाच शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न निर्माण करू शकतो. खरेच तू स्व.बळासाहेबांचा नातू आहेस काय ह्याचा पुरावा मागितला तर चालेल काय ? असा खरमरीत सवालही नितेश राणे यांनी केला आहे. मराठ्यांच्या मोर्चाला मूक मोर्चा असे कार्टून काढून हिनवण्याचे काम सामनामधून उद्धव ठाकरे यांनी केले. खा.संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या गादीच्या वंशजांचे पुरावे मागितले होते.शिवरायांचा अपमान केलात. शिवरायांच्या मावळ्यांना वाघनख चांगल्या पद्धतीने वापरता येते हे लक्षात ठेवावे असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.












