खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न

स्वसमर्पणातून शाळा घडविणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेत हर्षदा वाळके

खारेपाटण (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ही राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळविण्यास पात्र असणारी मराठी शाळा असून,ही शाळा घडविण्यात या शाळेचे मुख्याद्यापक श्रावणकर सर याचे मोलाचे योगदान आहे.त्यामुळे सरांची प्रेरणा घेऊन स्वसमर्पणातून शाळा घडविणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेत.” असे भावपूर्ण उदगार कणकवली पं.स.सभापती हर्षदा वाळके यांनी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या सेवापूर्ती सदिच्छा समारंभ कार्यक्रमात बोलताना काढले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर हे नियत वयोमानानुसार ३० जून रोजी शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा खारेपाटण नं.१ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभाचे आयोजन आज शनिवार २७ रोजी केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला जि.प.सदस्य प्राची ईसवलकर,पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव,गट शिक्षणाधिकारी श्री किशोर गवस, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,केंद्रप्रमुख सचीन जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते.याबरोबरच खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक विजय देसाई,योगेश गोडवे,माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रा.पं.सदस्य क्षितिजा धुमाळे,अस्ताली पवार,प.पू . भालचंद्र महाराज पतपेढी संचालिका श्रध्दा देसाई, प्रा.आ.केंद्र खारेपाटण वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,उपाध्यक्ष प्रियांका गुरव,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे,उमेश गुरव,निधी शिंदे,संध्या पोरे,प्रांजली बाबरदेसाई,मनोज करंदीकर माजी सदस्य अण्णा तेली,ऋषिकेश जाधव,शिवाजी राऊत,पूजा कासलीवाल,समीक्षा शेट्ये,शाळेचे माजी शिक्षक मारुती मेस्त्री, श्रीम.कोरगावकर,अर्चना तळगावकर,रेखा लांघी,अलका मोरे,सौ पारकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर व खारेपाटण केंद्र शाळेतून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सलग १३ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या आजी माजी सदस्य,विद्यार्थी पालक शिक्षक,ग्रामस्थ वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सभापती हर्षदा वाळके यांचे शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.तर गावातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देखील श्रावणकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच माजी शिक्षक,विद्यार्थी आणि पालक यांचे वतीने देखील श्रावणकर सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार यांनी “श्रावणकर सरांचा आदर्श घेऊन इतर शिक्षकांनी काम करून शाळांचा कायापालट करावा.”तर गट शिक्षण अधिकारी किशोर गवस यांनी श्री श्रावणकर यांनी शिक्षणक्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय असून ग्रामस्थ आणि पालक यांना विश्वासात घेऊन त्यांनी खारेपाटण शाळा राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल बनवली आहे.”तर जि.प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी “श्रावणकर सर याचे ऋण खारेपाटण वासीय कधीच विसरणार नाहीत कारण, शाळेशी निगडीत समाजातील कार्यकर्त्याची गोफलेली वीण अधिक मजबूत झाली असून ती पुढे अशीच टिकवणे काळाची गरज आहे.”
यावेळी मंगेश गुरव,गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण हायस्कूल पर्यवेशक संतोष राऊत, श्री सरकटे,श्रीम.ताळगावकर,ऋषिकेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत श्रावणकर सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रावणकर सर म्हणाले, “खारेपाटण गावाने मला नेहमीच सहकार्य केले आहे.माझ्या संपूर्ण सर्विसच्या काळात माझ्या स्वप्नातील शाळा मी घडवू शकलो याचा खूप आनंद आहे.तुम्ही प्रामाणिक काम करत रहा.लोक तुम्हाला आपोआप मदत करतील याची प्रचिती मला आली असून यातूनच खारेपाटण सारखी शाळा घडू शकली.जरी मी सेवानिवृत्त होत असलो.तरी जेव्हा आपण मला साद द्याल तेव्हा आवर्जून येईन असे सांगितले.” यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने कणकवली पं.स.च्या सभापती हर्षदा वाळके यांचा अध्यक्ष प्राप्ती कट्टी व गटशिक्षणाधिकारी श्री किशोर गवस यांचा मंगेश ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे तर प्रासविक व आभार शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मानले.

error: Content is protected !!