सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मनोहर पालयेकर यांचे निधन

सामाजिक क्षेत्रातील तारा हरपला

कणकवली (प्रतिनिधी) : नाथ पै नगर येथील रहिवासी व सेवानिवृत्त. मंडळ अधिकारी मनोहर रघुनाथ पालयेकर (७६) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी शहरातील विविध संघटनांवर नि: स्वार्थी बुद्धीने काम केले. अनेक विषयांना न्याय दिला.

तालुका प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीचेही ते पदाधिकारी होते .ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व इतर विविध संस्थांवर त्यांनी काम केले. या संघटनांवर काम करताना पेन्शनरचे प्रश्न असो सर्वसामान्य प्रवाशांचे प्रश्न अशा विविध समस्यांना त्यांनी वाचावी फोडली. शहरातील विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम त्यांचा नेहमी सहभाग असे.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजासाठी निस्वार्थी बुद्धीने योगदान दिले. अनेकांसाठी हे दीपस्तंभ स्तंभसारखे मार्गदर्शक होते. सदा हसत खेळत व्यक्तिमत्व मनमिळावू व विनोदी वृत्ती यामुळे अनेकांचे ते लाडके व्यक्तिमत्व बनून राहिले होते. नाथ पै नगर मध्ये प्रत्येकाशी त्यांचं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं होतं. सतत सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा,अजातशत्रू म्हणून त्यांची विशेष ओळख होती.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी जावई भाऊ सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संदीप ठाकूर यांचे सासरे होत.
त्यांच्या मृतदेहावर रात्री कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

error: Content is protected !!