मुंबई (ब्युरो न्युज) : तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने महत्वाचे निर्देश दिले होते. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. पण आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलू शकता.











