व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात

विजयदुर्ग (प्रतिनिधी): विजयदुर्ग येथे शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला पावनभुमीतून व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. नशाबंदी मंडळ आणि समाज कल्याण विभाग जि. प. सिंधुदुर्ग च्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने १ आक्टोबर ते ८ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताहाला विजयदुर्ग माध्यमिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संकल्प देऊन सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संवादाच्या माध्यमातून नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्याशी चर्चा करून व्यसनमुक्तीची महिती समजून घेतली . पोस्टर प्रदर्शनच्या माध्यमातून व्यसनांची दाहकता समजून घेतली. लालबहादूर शास्त्री, आणि महात्मा गांधी यांची जयंती साजरी करतांना त्यांचा विचार समजून घेतला तर समाजात व्यसनाधीनता कमी होण्यास मदत होईल. असे मत अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती दूत होऊन आपआपल्या परिसरात व्यसनमुक्ती बाबत पत्रके वाटणे, महिती देणे , ई. गोष्टी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. बिर्जे .जी. एम ( मुख्याध्यापक)सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले , व्यसनमुक्तीची शपथही दिली. या कार्यक्रमात शिंदे आर. जे. यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिंदे . एस. ए, रावराणे . एस . एस , माने. एम. एन, पडेलकर. एस. जे, एन.डी या शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहकार्य मिळाले. दक्षता समिती सदस्य श्रीमती लळीत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने नशाबंदी मंडळाबरोबर जोडून व्यसनमुक्तीसाठी कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यासाठी सभासद नोंदणी अभियान मंडळ राबवित आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!