शासकीय मेडिकल कॉलेजच्या कामकाजाचा खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

औषध पुरवठा आणि रुग्णसेवेबाबत डीन यांना दिल्या आवश्यक सूचना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या कामकाजाची आढावा बैठक आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. मेडिकल कॉलेजच्या डीन सुनीता रामानंद यांच्याकडून रुग्णसेवेचा व इमारतीच्या कामाचा आढावा खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक व जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घेतला. यावेळी रुग्णांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्याबाबत व औषध पुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या. डॉक्टर आणि स्टाफची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर. जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नागेश ओरोसकर,छोटू पारकर, योगेश तावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!