असलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशन ने केले अन्नदान

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकार महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम मध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली.यावेळी फाऊंडेशन च्या श्रद्धा पाटील,शांता पाटील, मीलन पाटील ,मयुरा भंडारे ,मनीषा मिठबावकर,नंदिता ढेकणे ,रविकिरण शिरवलकर,अनिल कांबळी ,सिद्धेश कांबळी ,अनुज कांबळी,हिंदरत्न डॉ सुभाष भंडारे उपस्थित होते ,यावेळी सुभाष भंडारे आणि अनिल कांबळी यांनी आर्थिक मदत केली ,याआश्रमात एकूण ४५ आजी आजोबा आहेत,यावेळीअक्षता कांबळी यांनी आश्रमातील आजी -आजोबा यांना मालवणी गजाली सांगून आणि सध्या सन मराठीवर “वेतोबा “मालिकेतील गावमामीचे फेमस वाक्य बोलून सर्वाना खूप हसवले .काही आजी आजोबा यांनी गाणी म्हणून दाखवली ,तसेच डॉ सुभाष भंडारे व सिद्धेश कांबळी यांनी गाणी म्हणत आजी -आजोबांना आनंदीत केले .दोन तास खेळीमेळीच्या वातावरणात गेले ,यावेळी आश्रमाचे सर्वेसर्वा संदेश शेट्ये व सर्व स्टाफ कर्मचारी यांनी अक्षता कांबळी आणि सर्वांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!