चौके ( अमोल गोसावी ) : एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या अभियानाअंतर्गत आज सकाळी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी मार्फत केंद्रशाळा कट्टा आवारात सफाई करण्यात आली तसेच राजन भगत घर ते ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडी वाढल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत होता म्हणून त्या बाजूची देखील सफाई करण्यात आली. यावेळी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच आबा कामतेकर, सुनील नाईक, सदस्य वंदेश ढोलम, ग्रामसेवक सरमळकर, श्री. गावकर, नाना परुळेकर तसेच केंद्रशाळा मुख्याध्यापक ठाकूर सर, शिक्षिका भाट, शंकरदास व सहकारी उपस्थित होते.