खा. नारायण राणेंची बंड्या नारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी न भूतो अशी उज्ज्वल कामगिरी करत आपल्या मंडलातील 4 पैकी तब्बल 3 जिल्हा परिषद बिनविरोध निवडून आणले. तसेच चौथ्या जिल्हा परिषद मतदारसंघातही उबाठा सेनेच्या उमेदवाराला चितपट करून भाजपाचे कमळ पडेल मंडलात शतप्रतिशत फुलवले. तसेच पंचायत समिती च्या 8 पैकी 6 जागांवर भाजपाचे बिनविरोध आणि एका जागेवर भाजपाचाच उमेदवार निवडून आणला. आजवरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यात पडेल भाजपा मंडला ने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या नेतृत्वाखाली आजवर ची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. खासदार नारायण राणे यांचे अलीकडील प्रकृती अस्वास्थ्यावर मात करून सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. या पार्श्वभूमीवर बंड्या नारकर यांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील राजकीय कारकिर्दीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पडेल मंडलात भाजपाने केलेल्या दैदीप्यमान यशाचे खासदार राणे यांनीही कौतुक केले.

error: Content is protected !!