फोंडाघाट (प्रतिनिधी) : इस्कॉन (ISCON) संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्टेस्ट’ (Value Education Contest) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट येथील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे प्रशालेचे आणि फोंडाघाट पंचक्रोशीचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.स्पर्धेत सुयश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुढील पाच जणांचा समावेश आहे:
१) अर्णव राजाराम भिसे
२) रुद्राक्ष विजयकुमार राठोड
३) कु. जिविका अमिताभ चव्हाण
४) कु. प्रयुक्ता प्रकाश हजारे ५) कु. वेदिका नामदेव लाड
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इस्कॉन संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कृ. पारकर, पर्यवेक्षक श्री. वि. पां. राठोड, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.











