खारेपाटण प्रा. आ. केंद्राचे समितीच्या वतीने करण्यात आले बाह्य मूल्यांकन
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने व गुणवत्ता आश्वासन कक्ष यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला आज “कायाकल्प उपक्रम” अंतर्गत सन २०२५-२६ करीता बाह्य मूल्यांकन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हातील शयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी सदिच्छा भेट देऊन खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डी. पी. एम. डॉ. साळुंखे उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम व साहय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सागर तरटे यांनी “कायाकल्प उपक्रम” टीमच्या प्रमुख डॉ. हर्षला वेदक यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले. तर कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काया कल्प अंतर्गत निवड झालेल्या काही प्रमुख प्राथमिक आरोग्य केंद्राचे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी ही टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती. दरम्यान बुधवार दि. ४ मार्च २०२६ रोजी सदर टीम खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. यावेळी येथील सद्यस्थितीत असलेल्या सोयी सुविधा व अत्यावश्यक असणाऱ्या गरजा व अन्य सोयी सुविधा यांच्याविषयी पाहणी करून चर्चा करण्यात आली व काही मार्गदर्शक सूचना देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राची काया कल्प योजनेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने निवड झाली असून या समितीचा मूल्यांकन अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर लवकरच राज्यस्तरीय समिती देखील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार असल्याचे समजते. तर काया कल्प टीमच्या प्रमुख डॉ. हर्षला वेदक यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
या भेटी दरम्यान खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक के. एस. वानोळे, पी. एस. भागवत, आरोग्य सहायिका उषा काटकर, एम. एम. बावकर, फार्मसिस्ट बी. एस. डोंगरे, कनिष्ठ सहाय्यक के. एम. सावंत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सिद्धेश बेळेकर, मुख्यालय आरोग्य सेविका सुचिता तळेकर, टेली मेडिसीन स्टाफ नर्स प्रमिला पाटणकर, एनसीडी स्टाफ नर्स प्राजक्ता तळेकर तसेच आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक संकिता पाटणकर व आशा स्वयंसेविका माधवी कांबळी, शिल्पा मेस्त्री, समृद्धी पाटील, अंकिता कांबळी, लॅब असिस्टंट स्वप्नाली घाडी, वाहन चालक सिन्दुर लवेकर, परिचर शरद नागवडे, विशाखा पाटणकर आदी कर्मचारी उपस्थित होते.











