कणकवली पं स नूतन सदस्यांचा महायुती गट स्थापन

गटनेतेपदी पवन भालेकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आलेल्या सदस्यांनी महायुती च्या नावाने गट स्थापन केला असून गटनेतेपदी पवन भालेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांना गट स्थापनेबाबत पत्र देण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांच्यासह पं स सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत, सोनू सावंत, गुरु शिंदे, सायली कृपाळ, लक्ष्मण गावडे, अण्णा खाडये, राजा जाधव, सौ मराठे, सौ पेडणेकर, राजश्री पवार,सौ महेश्वरी चव्हाण , हर्षदा वाळके, पवन भालेकर,सौ राणे सौ अक्षता राणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!