NMMS परीक्षेत काळसे हायस्कूलचे यश

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता 8 वी, NMMS 2025-26 (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे विद्यालयाचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्चिता विवेकानंद परब, स्पृहा सुधीर प्रभू आणि विराज दीपक काळसेकर यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक अविनाश परब, सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!