खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट संघ अंतिम विजेता तर वैभव इलेव्हन कलमठ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या स्पर्धेत वैभव इलेव्हन कलमठ, कणकवली या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या दोन्ही संघाना खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर व पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

खारेपाटण केदारेश्वर येथील भव्य मैदानावर दि. २७ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ अशी सलग तीन दिवस संपन्न झालेल्या या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम विजेता संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट या संघाला रोख रुपये २६०२६ /- व प्रथम क्रमांकाचा चषक तर उपविजेता वैभव इलेव्हन कलमठ या संघाला रोख रुपये १६०१६ रुपये व द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रदीप चव्हाण व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अजय मराठे तर स्पर्धेतील मालिकावीर म्हणून प्रथमेश चिंदरकर या खेळाडूना आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाला खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, विजय देसाई, शंकर राऊत, संदीप पाटणकर, सुमित सातविलकर, संतोष रोडी, जीदान सारंग, मंडळाचे कार्यकर्ते भाऊ राणे, अमोल गुरव, विठ्ठल गुरव, उमेश गुरव, संदेश घाडी, संदेश गुरव, अक्षय गुरव, रोहित गुरव, मकरंद गुरव, राजा गुरव, सार्थक गुरव, अजित गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

तर या क्रिकेट सामन्याला पंच म्हणून दैवत पारकर, अजय मराठे यांनी काम पाहिले. तसेच या स्पर्धेचे समालोचन संदेश तांबे व संतोष लोकरे यांनी केले. तर एम. एस. स्पोर्ट यू ट्यूब लाईव्हचे मालक अक्षय पांचाळ यांनी या क्रिकेट स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण केले होते.

यावेळी जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी केदारेश्वर मित्र मंडळाच्या क्रिकेट सर्धेचे कौतुक करून मंडळाने क्रिकेट बरोबरच अन्य सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.

error: Content is protected !!